
बंगळुरू : जनता दल (सेक्यूलर) पक्षाचा माजी खासदार प्रज्वल रेवन्ना याला बलात्काराच्या प्रकरणात गेल्या महिन्यात जन्मठेपेची शिक्ष झाली आहे. दरम्यान नुकतेच त्याला बंगळुरू येथील परप्पना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहातील ग्रंथालयात लिपिकाचे कामे सोपवण्यात आली आहेत.
कारागृह विभागाताली सूत्रांनी माहिती दिली की, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा याने कारागृगाच्या ग्रंथालयात पाच दिवसांपूर्वी काम करणे सुरू केले आहे. येथे तो पुस्तकांच्या नोंदी हाताळणे आणि लिपिकाची इतर कामे करत आहे. कारागृहाच्या नियमांनुसार, त्याला अकुशल कामगारांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. तसेच ग्रंथालयातली काम सोपवण्याच्या आधी त्याला बेकरी, सुतारकाम, बागकाम, पशुपालन किंवा हस्तकला असे पर्याय देखील देण्यात आले होते.
कधीकाळी हसन येथील खासदार राहिलेल्या रेवण्णा याला त्याच्या तुरुंगातील लिपिक म्हणून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून दररोजचा सुमारे ५२० रुपये मिळतील. आगामी काळात त्याला मिळणारा रोजगार हा कारागृहाच्या नियमांनुसार वाढेल. शिक्षा सुणावण्यात आल्यानंतर त्याला हाय सेक्युरिटी सेलमधून दोषींच्या विभागात स्थानांतरित करण्यात आले. याबरोबरच त्याला तुरुंगाचा गणवेश क्रमांक १५५२८ देण्यात आला आहे.
रेवण्णा याच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत, ज्यामध्ये तीन बलात्काराचे आणि एक लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्याचा समावेश आहे. बी. के. सिंह यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने (SIT) चौकशी केल्यानंतर या सर्व प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. या एसआयटीने ११३ साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारे सप्टेंबर २०२४ मध्ये १,६३२ पानांचे आरोपपत्र दाखल केले.
या आरोपपत्रात आरोपांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे, ज्यानुसार प्रज्वल रेवण्णा याने पीडितेवर दोन वेळा बलात्कार केला आणि या अत्याचाराचे व्हिडीओ रेकॉर्डिंग स्वतःच्या फोनमध्ये केले. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान हे व्हिडीओ लिक झाल्यानंतर ते या प्रकरणात महत्त्वाचा पुरवा ठरले. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या विष्लेशनामध्ये व्हिडीओमध्ये प्रज्वल रेवण्णा याच्या उपस्थितीची पुष्टी झाल्याने त्याच्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी मोठा पुरवा मिळाला.
खासदार आणि आमदार यांच्याविरोधातील गुन्हेगारी खटल्यांच्या विशेष न्यायालयाने प्रज्वल रेवण्णा याला घरात काम करणाऱ्या महिलेवर कुटुंबाच्या फार्महाऊसवर बलात्कार केल्याच्या आरोपात दोषी ठरवले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आतापर्यंत फक्त एका प्रकरणात प्रज्वल रेवण्णा याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, अद्याप त्याच्याविरोधातील उर्वरित तीन प्रकरणात सुनावणी होणे बाकी आहे.